Pimpri Corona Update: शहरात आज 209 नवीन रुग्णांची भर, 136 जणांना डिस्चार्ज; चार जणांचा मृत्यू

209 new patients added in the city today, 136 discharged; Four people died :शहरात आज 209 नवीन रुग्णांची भर, 136 जणांना डिस्चार्ज; चार जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 191 आणि शहराबाहेरील 18 अशा 209 जणांना आज (शनिवारी) कोरोनाची लागण झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 136 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. तर, आज एकाचदिवशी चार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 4364 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

महापालिकेने साडेचार वाजताच्या आकडेवारीनुसार प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यात शहराच्या नेहरुनगर, ज्योतीबानगर काळेवाडी, जुनी सांगवी, गुळवेवस्ती भोसरी, रुपीनगर तळवडे, काचघर निगडी, शाहुनगर चिंचवड, संत तुकाराम नगर पिंपरी,वैदुवस्ती पिंपळे गुरव, साईचौक पिंपरी, गुरुदेवनगर आकुर्डी, बंजरंगनगर खराळवाडी, प्राधिकरण निगडी, पवारनगर सांगवी, कासारवाडी, कामागार नगर पिंपरी, गायकवाडनगर दिघी, इंदिरानगर निगडी, पाटीलनगर चिखली, गव्हाणेवस्ती भोसरी, घरकुल चिखली, कुदळे चाळ पिंपरी, साईकॉलनी रोड रहाटणी, मोरवाडी पिंपरी, पिंपळे सौदागर, गणेशनगर भोसरी, शास्त्री कॉलनी पिं.सौदागर, गांधीनगर पिंपरी, केशवनगर कासारवाडी, एच.ए कॉलनी, आदिनाथनगर भोसरी, गांगुर्डेनगर पिं. गुरव, आदर्शनगर काळेवाडी, इंदिरानगर चिंचवड,लांडेवाडी, जयभिम नगर दापोडी, बोपखेल, खंडोबामाळ भोसरी, आळंदीरोड भोसरी, लिंकरोड पिंपरी, विद्यानगर चिंचवड, पंचतारानगर आकुर्डी, एम्पायर इस्टेट चिंचवड, लक्ष्मीनगर पिं.गुरव, अष्टविनायक चौक आकुर्डी, च-होली, पवनानगर काळेवाडी, देहु-आळंदी रोड चिखली, क्षितीज नगर चिंचवड, साईबाबानगर चिंचवड, शिवधन रेसिडन्सी आकुर्डी, ताम्हाणेवस्ती चिखली,सुदर्शनगर पिं. गुरव, शिवानंद पिंपरी, काळभोरचाळ निगडी, पवनेश्वर मंदिर पिंपरी, मिलींदनगर पिंपरी, शिवनेरी बिल्डींग पिंपळे गुरव, बौध्दनगरपिंपरी, राजवाडेनगर काळेवाडी, रमाबाईनगर पिंपरी, भाटनगर, संभाजीनगर, चक्रपाणी वसाहत भोसरी, विठ्ठलनगर नेहरुनगर, चक्रपाणी वसाहत भोसरी, दत्तनगर चिंचवड, विठ्ठलवाडी आकुर्डी,आंबेडकरनगर पिंपरी, शरदनगर पिंपरी, शिवाजीवाडी भोसरी, विजयनगर पिंपरी, नढेनगर काळेवाडी, गजानननगर पिं.गुरव, म्हलारी बिल्डींग भोसरी, धावडेवस्ती भोसरी, यमुनानगर निगडी, दत्तनगर चिंचवड, इंद्रायणीनगर भोसरी, यशवंतनगर पिंपरी, उदयनगर पिंपरी, फुलेनगर भोसरी, पदमावती नगरी चिखली, लांडगेआळी भोसरी, बनगरवस्ती मोशी, मोहननगर चिंचवड, जाधववाडी भोसरी, गणेश साम्राज्य मोशी, ढोरेनगर सांगवी, काळभोर नगर चिंचवड, शिवरत्न कॉलनी काळेवाडी, म्हाळसाकांत चौक आकुर्डी, विकासनगर किवळे, कोकणेनगर काळेवाडी, एकता सोसायटी मोशी, विन्डसर पार्क वाकड, तुळजाई वस्ती आकुर्डी, प्रियदर्शनीनगर जुनी सांगवी, श्रीनगर काळेवाडीतील 191 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये 117 पुरुष आणि 74 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. चिंचोली देहूरोड, येरवडा, औंध, आळंदी, मारुंजी, चाकण, सिंहगड रोड, हडपसर, देहूगाव, खेड, बानेर येथील 10 पुरुष आणि 8 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.

तर, ताम्हाणेवस्ती चिखली, आनंदनगर चिंचवड, लांडेवाडी भोसरी,विठ्ठलनगर पिंपरी, कैलासनगर थेरगाव, चक्रपाणी वसाहत भोसरी, महेशनगर पिंपरी, पवारनगर सांगवी, मोरवाडी, इंदिरानगर चिंचवड, गांधी वसाहत, सिध्दार्थ नगर दापोडी, बोपखेल, शास्त्री चौक भोसरी, बौध्दनगर ओटास्किम, राजीवगांधी वसाहत नेहरुनगर, कुलदीप आंगण नेहरुनगर, वैशालीनगर पिंपरी, गंधर्वपार्क चिंचवड, दिघीरोड भोसरी, डिमार्टजवळ रावेत, आदर्शनगर दिघी, साईबाबानगर चिंचवड, मासुळकर कॉलनी पिंपरी, काळभोरनगर चिंचवड, यमुनानगर, केशवनगर चिंचवड, दत्तनगर, शिवतीर्थ कॉलनी काळेवाडी, ज्योतिबानगर काळेवाडी, साई कृष्णपार्क थेरगाव, पिंपरी कॉलनी, गणेशनगर थेरगाव, दळवीनगर, गवळीमाथा भोसरी, जाधववाडी चिखली, च-होली, सुदर्शननगर पिंपळे गुरव, संत तुकारामनगर भोसरी, सिध्दार्थ कॉम्प्लेक्स काळेवाडी, रिव्हर रोड पिंपरी, शाहुनगर चिंचवड, मोरेवास्ती चिखली, सृष्टी चौक पिं. गुरव, नखातेनगर थेरगाव, केसर ट्री टाऊन मोशी, सोनवणे वस्ती चिखली, आळंदी रोड चिखली, जैन मंदीर भोसरी, काटेचाळ दापोडी, लक्ष्मी नगर पिंपळे गुरव, कासारवाडी, मुंजोबारोड मंदीर वाकड, अशोक नगर पिंपरी, आंबेडकर कॉलनी पिंपरी, गुरुदेव नगर आकुर्डी, भाटनगर, बौध्दनगर, बाणेर, येरवडा, दौंड, आंळदी, बोपोडी, नवी पेठ, धानोरी, दत्तवाडी पुणे येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 79 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

तर, शहरातील एम्पायर इस्टेट चिंचवड येथील 78 वर्षीय महिला, सेक्टर 25 निगडीतील 62 वर्षीय महिला, सानेवस्ती चिखलीतील 48 पुरुष वर्षीय, वाल्हेकरवाडी चिंचवड येथील 61 वर्षीय पुरुष अशा चार जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार साडेचार वाजेपर्यंत शहरातील 3967 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर, सातत्याने अपडेट होणा-या डॅशबोर्डनुसार शहरात आजपर्यंत 4034 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 2369 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 57 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 32 अशा 89 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1532 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 3751

# पॉझिटीव्ह रुग्ण – 209

#निगेटीव्ह रुग्ण – 4364

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 1237

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 2250

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 3616

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 4034

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 1532

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 89

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 2369

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 25865

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 84013

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.