Pimpri : बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी 21 जणांना अटक

एमपीसी न्यूज – मतदान केंद्राबाहेर बेकायदेशीर जमाव करून थांबल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी 21 जणांना अटक केली. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या 188 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. हा प्रकार पिंपरीगाव येथील नव महाराष्ट्र शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सोमवारी (दि. 21) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडला.

राकेशकुमार मुन्नीलाल चौरसिया (वय 28), जितेंद्र कुमार रामकेस चौरसिया (वय 30), अजित सारदा शर्मा (वय 28), दीनानाथ रामकेस निसाद (वय 19), राहुल जितेंद्र यादव (वय 20), रोहित रामबच्चन यादव (वय 20), सुमन मोहनराम कुमार (वय 19), विनोद सीताराम पाल (वय 21), वीरेंद्र रामविलास पाल (वय 24), यशवंत गुलजारी पासवान (वय 35), कुलदीप चंद्रभोकनसिंग कुमार (वय 19),

अखिलेश कुमार सुरजबाबू (वय 24), अनिल कुमार शंकर यादव (वय 23), पवनकुमार लालबाबू गौतम (वय 23), दिलीप गंगाधर भोर (वय 20), अनिल धन्नू जाधव (वय 25, सर रा. कस्पटे वस्ती, वाकड), अरबाज जुबेर सय्यद (वय 20), संतोष राम जाधव (वय 22), वैभव श्रीमंत नरवडे (वय 20), गजानन सुभाष जाधव (वय 20), गणेश अनिल अवसरे (वय 20, रा. काळेवाडी फाटा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रक्रिया सुरु असताना पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश असताना वरील आरोपी पिंपरीगाव येथील नवमहाराष्ट्र शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोळका करून थांबले. जमावाला थांबण्यासाठी बंदी असल्याने सर्वांना पोलिसांनी जाण्यास सांगितले. मात्र, आरोपींनी पोलिसांच्या आदेशाचे पालन न करता जमाव कायम ठेवला. यावरून सर्वांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 188 आणि मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.