Pimpri : शहरातील 21 हजार 500 विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा; आज इंग्रजीचा पेपर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण ( Pimpri) मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेला आज (बुधवार, दि. 21) पासून सुरुवात होत आहे. पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आहे. पिंपरी चिंचवड शहरातील 21 हजार 500 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.

शहरातील 33 केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. शहरासाठी दोन कस्टडी केंद्र देण्यात आली आहेत. श्री म्हाळसाकांत माध्यमिक विद्यालय कस्टडी अंतर्गत 13 उपकेंद्र आहेत. तर डॉ. डी वाय पाटील आर्ट, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय कस्टडी अंतर्गत 20 उपकेंद्र आहेत.

Talegaon Dabhade : एनएमआयईटीचा व्ही इनोव्हेट टेक्नोलॉजीस सोबत सामंजस्य करार

विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी महत्वाच्या विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळाकडून मंडळाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर केले आहे. कॉपीमुक्त अभियानासाठी परीक्षा मंडळाने पिंपरी विभागासाठी तीन भरारी पथके नेमली आहेत.

परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या अगोदर अर्धा तास परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना दिलेल्या हॉल तिकिटावर नमूद केले आहे. सकाळच्या सत्रात सकाळी 10.30 वाजता तर दुपारच्या सत्रात दुपारी 2.30 वाजता परीक्षार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळी 11 वाजता आणि दुपारी तीन वाजता प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल. मागील वर्षी प्रमाणे यावर्षीच्या परीक्षेसाठी देखील निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली ( Pimpri) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.