Pimpri: बोऱ्हाडेवाडीतील रस्ते डांबरीकरणासाठी 22 कोटी; पिंपळे गुरव येथील रस्ते अद्यावत करण्यासाठी 18 कोटी!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची आयत्यावेळी मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप सत्ताधा-यांकडून अद्यावत पद्धतीच्या नावाखाली रस्ते विकासावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. बो-हाडेवाडी, बनकरवस्तीतील रस्त्यांचे हॉटमिस्क पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी सुमारे 22 कोटी 53 रुपये खर्च केले जाणार आहेत. शहरातील सर्वात विकसित आणि स्मार्ट सिटीअंतर्गत कामे सुरु असलेल्या पिंपळेगुरव परिसरातील मुख्य रस्ते अद्यावत पद्धतीने विकसित केले जाणार आहेत. त्यासाठी सुमारे 18 कोटी 63 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आज (बुधवारी) आयत्यावेळी मान्यता दिली.

भाजपच्या पहिल्या स्थायी समितीने शहरातील विविध भागाच्या रस्त्यांचा विकास, रस्त्यांवर डांबरीकरण, मजबुतीकरण, रस्ते विकसित करणे यावर सुमारे 500 कोटींहून अधिक रुपये खर्च केले आहेत. रस्त्याचे अद्यावतीकरण करण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत.

बो-हाडेवाडी, बनकरवस्तीमधील रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी महापालिकेने निविदा मागविली होती. निविदा रक्कम सुमारे 24 कोटी दहा लाख 21 हजार रुपयांची होती. महापालिकेने रॉयल्टी व मटेरीयल टेस्टींग चार्जेस वगळून सुमारे 23 कोटी 85 लाख 25 लाख रुपयांची निविदा मागविली होती. त्यामध्ये तीन ठेकेदारांच्या निविदा आल्या. धनेश्वर कन्स्ट्रक्शन (निविदा दर 1.00 टक्के), कृष्णाई इंफ्रास्ट्रक्चर (4.1 टक्के), आणि अजवानी इंफ्रास्ट्रक्चर (4.5 टक्के) दराच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या.

त्यापैकी धनेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराची निविदा रकमेच्या 24 कोटी 10 लाख मधून रॉयल्टी व मटेरीयल टेस्टींग चार्जेस वगळून 23 कोटी 85 लाख पेक्षा 6.55 टक्के कमी दराची आहे. तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची असल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 22 ऑगस्ट 2019 रोजी निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली. त्यानुसार या ठेकेदाराकडून रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग चार्जेसह सुमारे 22 कोटी 53 लाख रुपयांमध्ये काम करुन घेण्यात येणार आहे.

प्रभाग क्रमांक 31 मधील परिसरातील मुख्य रस्ते अद्यावत पद्धतीने करण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. मूळ निविदा सुमारे 20 कोटी 72 लाख रुपयांची होती. महापालिकेने रॉयल्टी व मटेरीयल टेस्टींग चार्जेस वगळून 20 कोटी 55 लाख रुपयांची निविदा मागविण्यात आली. यामध्ये मोहनलाल माथरानी कन्स्ट्रक्शन (निविदा दर 10.17 टक्के), व्ही. एम. मातेरे इन्फ्रा (5.40 टक्के), इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन (3.90 टक्के), आणि एच.सी. कटारिया (2.00 टक्के) या चार ठेकेदारांच्या निविदा आल्या प्राप्त झाल्या होत्या.

त्यामध्ये मोहनलाल माथरानी कन्स्ट्रक्शन यांची निविदा रकमेच्या 20 कोटी 72 लाख मधून रॉयल्टी व मटेरीयल टेस्टींग चार्जेस वगळून 20 कोटी 55 लाख पेक्षा 10.17 टक्के कमी दराची निविदा आहे. तुलनात्मकदृष्टया वाजवी दराची निविदा असल्याने आयुक्तांनी 4 ऑगस्ट 2019 रोजी निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली. त्यानुसार या ठेकेदाराकडून रॉयल्टी व मटेरीयल टेस्टींग चार्जेससह 18 कोटी 63 लाख रुपयांमध्ये काम करुन घेण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

दरम्यान, पिंपळे सौदागर हा परिसर शहरातील सर्वांत विकसित परिसर आहे. स्मार्ट सिटीची देखील याच परिसरात कामे सुरु आहेत. परिसरातील रस्ते अद्यावत असताना पुन्हा त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.