Pimpri: ‘अमृत’ योजनेसाठी केंद्र, राज्य सरकारकडून 22 कोटींचा निधी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात अमृत अभियानांतर्गत राबविण्यात येणा-या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून 22.17 कोटी रुपयांच्या निधीचा तिसरा हप्ता मंजूर झाला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचे 14.78 कोटी आणि राज्य सरकारचे 7.39 कोटी असे 22.17 कोटी रुपयांचा निधी अमृतच्या कामासाठी महापालिकेला प्राप्त झाला आहे.

केंद्र शासनामार्फत राबविल्या जाणा-या अमृत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पाणीपुरवठा, मलनिःसारण व हरित क्षेत्र विकास प्रकल्प सुरु आहेत. या प्रकल्पांची किंमत 147.84 कोटी रुपये आहे. त्यामध्ये महापालिकेचा 50 टक्के स्वहिस्सा आहे. तर, केंद्र सरकारचा 33 टक्के आणि राज्य सरकारचा 17 टक्के हिस्सा आहे.

  • केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीचा तिसरा हप्ता प्राप्त झाला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचे 14.78 कोटी आणि राज्य सरकारचे 7.39 कोटी रुपये दिले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून एकूण 22.17 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे.

ही कामे अमृत अंतर्गत सुरु आहेत :
आकुर्डी, पुनावळे, च-होलीत उद्यान विकसित करण्यात येत आहे. ही रक्कम महापालिकेकडून या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी वापरण्यात आली आहे. या प्रकल्पांचे काम नियोजनाप्रमाणे सुरु असून ती कामे नियोजित वेळेत पूर्ण होईल. यावर विशेष लक्ष दिले जात असल्याचे महापालिकेने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like