Pimpri: शहरातील 22 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; आनंदनगर झोपडपट्टीतील 23 जणांना डिस्चार्ज

22 people in the city reported positive; 23 discharged from Anandnagar slum

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 22 जणांना आज (मंगळवारी) कोरोनाची लागण झाली आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. तर, चिंचवड, आनंदनगर झोपडपट्टीतील दहा दिवस पूर्ण झालेल्या 23 जणांना घरी सोडण्यात आले आहे.  बालेवाडीतील कोविड केअर सेंटरमधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आले आहेत. त्यामध्ये शहरातील 22 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील 559 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 267 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 282 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर, शहरातील दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 बालेवाडी कोविड केअर सेंटरमधून 23 जणांना घरी सोडण्यात आले आहे. आनंदनगर झोपडपट्टीतील रुग्ण बरे होण्यास सुरुवात झाली आहे. आज एकाचदिवशी 23 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांनुसार दहा दिवस उपचार केल्यानंतर कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीला घरी सोडण्यात येत आहे. त्यानुसार बालेवाडीतील कोविड केअर सेंटरमधून 23 जणांना आज घरी सोडले आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत आहे.

सर्वाधिक 229 युवकांना कोरोनाची लागण !

कोरोनाने युवकांना अक्षरश: विळखा घातला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 22 ते 39 वयवर्ष असलेल्या 229 युवकांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 130 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 78 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 59 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 62 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.