Pimpri: प्लॅस्टिकचा वापर करणा-यांकडून 25 हजारांचा दंड वसूल; सुमारे एकवीस किलो प्लॅस्टिक जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने प्लॅस्टिकचा वापर करणा-या पाच व्यावसायिकांकडून पंचवीस हजार रुपये दंड वसूल केला आहे. तसेच सुमारे एकवीस किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.

महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लॅस्टिक न वापरण्याबाबत जनजागृती मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत प्लॅस्टिकचा वापर करताना आढळून आलेल्या पाच व्यावसायिकांकडून पंचवीस हजार रुपये दंड आकारणी करून सुमारे एकवीस किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. स्पाइन रोड मोशी येथील स्पाइन मॉल परिसरातील सुमारे पंचवीस दुकानांची पाहणी आज करण्यात आली.

क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत सहाय्यक आरोग्य अधिकारी बी.बी.कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर.एम भोसले, आरोग्य निरीक्षक विजय दवाळे, राजेंद्र उज्जैनवाल, वैभव कांचन-गौडार, सचिन जाधव यांच्या पथकाने प्लॅस्टिक जप्तीची कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.