Pimpri: टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनची 27 वी वार्षिक सभा उत्साहात

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनची 27 वी वार्षिक सर्वसाधरण सभा उत्साहात पार पडली. युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे यांनी युनियन, सर्व सभासदांना भेडसावणाऱ्या अडी-अडणींसाठी युनियन नेहमीच कटिबद्ध राहील अशी ग्वाही दिली.

पिंपरीतील आचार्य अत्रे सभागृहात रविवारी (दि.12) सभा झाली. टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे, जनरल सेक्रेटरी संतोष दळवी, अशोक माने, खजिनदार अबिदअली सय्यद यांच्यासह माजी पदाधिकारी, प्रतिनिधी व इतर सभासद सभेस हजर होते. सभेला 858 सभासद उपस्थित होते. शिशुपालसिंह तोमर, विक्रम वर्षे या युनियन प्रतिनिधींनी उपस्थितांचे स्वागत केले.

युनियनने सन 2019 मध्ये केलेल्या कामाची माहिती सर्व सभासदांना दिली. सभेतील नोटीशीमध्ये नमूद केलेल्या विषयांवर चर्चा होऊन ठराव मंजूर करण्यात आले. सचिन लांडगे यांनी सभासदांना भेडसावणाऱ्या अडी-अडणींसाठी युनियन नेहमीच कटिबध्द असेल, अशी ग्वाही दिली. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची यावेळी अध्यक्षांनी समर्पक उत्तरे दिली.

खजिनदार अबिदअली सय्यद यांनी 2018 चा युनियनचा वार्षिक ताळेबंद सभेस वाचून दाखविला. त्यास मान्यता घेतली. जनरल सेकेटरी संतोष दळवी यांनी नवीन ठरावास व घटनादुरुस्तीमध्ये युनियनच्या घटनेमध्ये पदाधिकारी व प्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या या खाली युनियनच्या निवडणुकांनंतर नव्याने निवडून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व युनियने केलेला पत्रव्यवहार, कागदपत्रे, चेकबुक, हिशोब सर्व पावत्यांसहीत, सर्व ताळेबंद, सर्व सभांची नोंद व त्यांचा अहवाल असलेली पुस्तके व त्या संबंधिची सर्व कागदपत्रे इ. त्यांच्या स्वाधीन करणे असे नव्याने नमूद केले जाईल.

त्याचबरोबर युनियनच्या हिशोबामध्ये काही गैरव्यवहार, युनियनच्या हितास बाधा येणारे कृत्य आढळून आल्यास युनियनची कार्यकारिणी सदर पदाधिकार्‍यास त्याची पूर्ण बाजू ऐकून घेतल्यानंतर घटनेप्रमाणे त्यावर निर्णय घेतला जाईल. या दोन्ही सूचना दळवी यांनी मांडल्या. त्याला सर्व सभागृहाने हातवर करुन मान्यता दिली. घटनेमध्ये केलेल्या सुयोग्य बदलामुळे सर्व सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सभेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.