Pimpri: ‘कोरोनामुक्त’ रुग्णांना टाळ्यांचा कडकडाट करत सोडले घरी; पदाधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 14 दिवस उपचार घेऊन  ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत झालेल्या पहिल्या तीन रुग्णांना आज (शुक्रवारी) महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यावेळी आरोग्य कर्मचारी, पदाधिकारी यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.

कोरोनाचे पहिले तीन पॉझिटीव्ह रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परत गेले आहेत. त्यांना पुढील चांगल्या आयुष्यासाठी महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, माजी पक्षनेते एकनाथ पवार यांनी शुभेच्छा दिल्या. यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉ. राजेंद्र वाबळे त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आलेल्या यशाचे कौतुक केले.

 14 दिवसांनंतरच्या आणि दुस-या तपासणीत देखील त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले होते. त्यामुळे हे रुग्ण पूर्णपणे ‘कोरोनामुक्त’ झाल्याचे स्पष्ट झाले.  या तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like