Pimpri: पोलीस असल्याचे बतावणी करून तिघांकडून लुटले 33 हजार रुपये

एमपीसी न्यूज-  पोलीस असल्याची बतावणी करून तपासणीच्या बहाण्याने तिघांकडून 33 हजार रुपये(Pimpri) लुबाडण्यात आले आहेत. ही घटना पिंपरी पुलाजवळ 6 मे 2024 रोजी घडली होती.

याप्रकरणी सोहेल गुलफाम खान (वय 23 रा. थेरगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात(Pimpri) बुधवारी (दि.15) फिर्याद दिली आहे . यावरून पोलिसांनी दोन अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रासह रिक्षाने पिंपरी कडे निघाले होते. यावेळी पिंपरी पुलावर आले असता दोन अज्ञात इसमाने दुचाकीवरून येऊन त्यांना अडवले. तसेच आम्ही क्राईम ब्रांच पोलीस असल्याचे सांगत तुमच्याकडे गांजा आहे आम्हाला तपासणी करायची आहे असे सांगितले.

Pimpri: बस प्रवासातून महिलेचे 2 लाख रुपयांचे दागिने चोरीला

यावेळी त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना तुम्ही गांजाची विक्री करता असे दमदाटी  करत फिर्यादी यांच्या खिशातील साहित्य बाहेर काढण्यास सांगून फिर्यादी यांच्याकडून 13 हजार रुपये व त्यांच्या दोन्ही मित्राकडून दहा-दहा हजार असे 33 हजार रुपये घेत ते तिथून पसार झाले.

मात्र ते पोलीस नसून त्यांनी आपली फसवणूक केली आहे हे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.