Pimpri Corona Update: दिवसभरात 34 जण कोरोनामुक्त, 20 जणांना लागण; बालेवाडीमधील एकाचा YCMH मध्ये मृत्यू

Pimpri Corona Update: 34 corona-free, 20 infected during the day; One from Balewadi dies in YCMH

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 34 जण आज, सोमवारी कोरोनामुक्त झाले आहेत. तर, शहरातील 14 पुरुष आणि 6 महिला अशा 20 जणांना आज (सोमवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, बालेवाडी येथील 60 वर्षीय वृद्धाचा वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरातील आनंदनगर, दापोडी, भारतनगर- पिंपरी, मोरवाडी, दत्तनगर, थेरगाव, पाटीलनगर, चिखली, भाटनगर, वडमुखवाडी आणि भोसरीतील 20 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 14 पुरुष आणि 6 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आज एकाचदिवशी 34 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आनंदनगर, बौद्धनगर, दत्तनगर आकुर्डी, सांगवी, किवळे, पिंपळेगुरव, रहाटणी, भोसरी, पिंपळेसौदागर, विजयनगर दिघी, भाटनगर, बालघरे वस्ती चिखली, दापोडी, काळेवाडी फाटा, सद््गुरु कॉलनी वाकड, मोरेवस्ती, पिंपरी, आकुर्डी, निगडी, सांगवी, चिंचवड स्टेशन, आंबेगाव आणि मावळ येथील 34 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आज सोमवारपर्यंत 788 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 472 कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरातील 14 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 18 अशा 32 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 287 सक्रीय रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 93

# पॉझिटीव्ह रुग्ण – 20

#निगेटीव्ह रुग्ण – 116

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 198

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 562

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 123

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 788

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 287

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 32

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 472

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 25771

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 77367

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.