Pimpri : पिंपरी येथे अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार


एमपीसी न्यूज – पिंपरी येथे एका 15 वर्षीय मुलावर अज्ञात व्यक्तीने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी घाबरलेल्या मुलाने पिंपरी पोलीस ठाण्यात संबंधित इसमा विरुद्ध तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार मुलाचे वडील टेम्पो चालक आहेत. 27 सप्टेंबर रोजी मुलगा पिंपरी येथील नेहरुनगर भागात संतोषी माता चौकात बसला असताना आरोपी दुचाकीवरून आला होता. त्याने मुलाला टेम्पो भाड्याने हवा आहे. त्यासाठी त्याने मुलाला गाडीवर बसवून घेतले वडिलांकडे चल म्हणून त्याने गाडीवरून भोसरीतील गुलाब गार्डनजवळ गवळी माथा येथे नेले. तेथे त्याने झाडीत नेऊन मुलावर अत्याचार केले. तसेच बाहेर सांगशील तर मारून टाकीन अशी धमकी दिली.

मुलाने आरोपीचे वर्णन सांगितले असून त्यानुसार आरोपी सावळ्या रंगाचा, दाढी असलेला व अंदाजे 20 ते 25 वयोगटातील असल्याचे सांगितले आहे. पोलिसांना अद्याप आरोपीची ओळख पटली नसून पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.   

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.