Pimpri: औद्योगिकनगरीत आजपर्यंत 35682 जण होम क्वारंटाईन तर 21212 क्वारंटाईन मुक्त

Pimpri: 35682 home quarantine and 21212 quarantine free in industrial city pimpri-chinchwad till date त्यामुळे महापालिकेने परदेशातून आलेले नागरिक, त्यांच्या कॉन्टॅक्टमधील, निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यापासून आजपर्यंत 35 हजार 682 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी 21 हजार 212 जणांचा 28 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्याने ते क्वारंटाईन मुक्त झाले आहेत. तर, आजमितीला 1 ते 14 दिवसांसाठी 8091 जण ‘अ‍ॅक्टिव्ह’ होम क्वारंटाईन आहेत. त्यांच्यावर महापालिका देखरेख ठेवते. तर, पॅसिव्ह म्हणजे 14 ते 28 दिवसांसाठी 6367 जण ‘होम क्वारंटाईन’ आहेत. त्यांनी होम क्वारंटाईन असल्याबाबत महापालिकेला माहिती देणे आवश्यक आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण शहरातील होता. पहिले 12 रुग्णही परदेशातून आले होते.

त्यामुळे महापालिकेने परदेशातून आलेले नागरिक, त्यांच्या कॉन्टॅक्टमधील, निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली. आजपर्यंत शहरातील 35 हजार 682 नागरिकांना ‘होम क्वारंटाईन’ केले होते.

त्यातील 28 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेल्यांना मोकळे केले जाते. पहिल्यांदा 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी होता. त्यामध्ये वाढ करत 28 दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी केला आहे.

आजपर्यंत 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेले 21 हजार 212 जण होम क्वारंटाईन मुक्त झाले आहेत.

सध्या 1 ते 14 दिवसांसाठी शहरातील 8091 जण अ‍ॅक्टिव्ह होम क्वारंटाईन आहेत. त्यांच्यावर महापालिका देखरेख ठेवते. तर, 14 दिवसानंतर 28 दिवसांसाठी होम क्वारंटाईन असलेल्यांना पॅसिव्ह क्वारंटाईन संबोधले जाते.

आजमितीला 6367 नागरिक पॅसिव्ह होम क्वारंटाईन आहेत. त्यांनी होम क्वारंटाईन असल्याची, काही त्रास होत असेल तर स्वत:हून महापालिकेला माहिती देणे अपेक्षित आहे. होम क्वारंटाईन नागरिकांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत राहते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.