BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आज 36 वा वर्धापनदिन

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आज 36 वा वर्धापनदिन साजरा होत आहे. या निमित्त आज संध्याकाळी ६ वाजता भोसरीच्या अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये शहरातील उद्योजक, गुणवंत कामगार, व विशेष नैपुण्य प्राप्त संस्था आणि व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते केले जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव असणार आहेत. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, खासदार अमर साबळे, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, अॅड. गौतम चाबुकस्वार, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती अध्यक्ष ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने आदी उपस्थित राहणार आहेत.

आज सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. वर्धापनदिनानिमित्त रस्सीखेच, संगीतखुर्ची, होम मिनिस्टर (खेळ रंगला पैठणीचा), रांगोळी, पाककला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दुपारी 12 वाजता मुख्य प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात अभिरूप महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता पालिकेच्या अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम गीत संगीत होणार आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
.