Pimpri: शहरात आज 379 नवीन रुग्ण; 286 जणांना डिस्चार्ज, 11 मृत्यू

379 new patients in the city today; 286 discharged, 11 dead : आजपर्यंतची रुग्णसंख्या  7637

एमपीसीन्यूज  – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 361 आणि  शहराबाहेरील 18 अशा 379  जणांना आज (सोमवारी) कोरोनाची लागण झाली आहे.  तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 286  जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.  दरम्यान, आजपर्यंतची रुग्णसंख्या  7637 वर पोहोचली आहे.

महापालिकेने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार, आज एकाचदिवशी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. भाटनगर पिंपरीतील 60 वर्षीय पुरुष,  इंदिरानगरमधील 60 वर्षीय महिला,  आकुर्डीतील 73 वर्षीय वृद्ध,  मिलिंदनगर पिंपरीतील 90 वर्षीय वृद्ध महिला,  यमुनानगरमधील 80 वर्षीय वृद्ध,  भोसरीतील 64 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 60 वर्षीय महिला, पिंपरीगावातील 68 वर्षीय पुरुष,  निगडीतील 76 वर्षीय वृद्ध महिला आणि शहराबाहेरील चाकण येथील 59 वर्षीय पुरुष, खडकी बाजार येथील 65 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 7637 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 4598 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 120 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 43 अशा 163 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2122 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 885

# पॉझिटीव्ह रुग्ण – 379

#निगेटीव्ह रुग्ण – 795

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 1812

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 2122

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 906

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 7637

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 2122

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 163

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 4598

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 22719

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 73315

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.