Pimpri : ‘आयडीबीआय’कडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला 40 लाखांची मदत

40 lakh assistance from IDBI to Pimpri Chinchwad Municipal Corporation :

एमपीसी न्यूज – आयडीबीआय बॅंकेकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कोरोना विरूद्ध लढाईसाठी तब्बल 40 लाखांची मदत करण्यात आली आहे. मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. तसेच बॅंकेने केलेल्या मदतीबाबत त्यांचे आभार मानले आहेत.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी आयडीबीआय बॅंकेकडून हा मदतीचा धनादेश श्री पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

दरम्यान, ॲक्सिस बॅंकेकडून सुद्धा कोरोना विरूद्ध लढाईसाठी आवश्यक असणारी विविध साधने मदत म्हणून देऊ केली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.