pimpri: खासगी रुग्णालयातील 42 कोरोना संशयित ‘क्वारंटाईन’

एमपीसी न्यूज – पिंपरी परिसरातील एका खासगी रुग्णालयात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने रुग्णालयातील 42 संशयितांना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत.

शहरात शनिवारी (दि.4) एकाच दिवशी सहा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. त्यामध्ये दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 23 नागरिकांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आलेल्या चार जणांना आणि खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या दोघांना लागण झाली होती.

पिंपरीतील खासगी रुग्णालयातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाचे ऑपरेशन करण्यात आले होते. त्यामुळे रुग्णालयातील 42 जणांना क्वारंटाईन केले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. दरम्यान, महापालिकेने पाठविलेल्या 22 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.