Pimpri: महापालिकेचे 43 कर्मचारी राज्य सरकारच्या सेवेत

कर्मचा-यांना पुन्हा महापालिका सेवेत घेतले जाणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत आस्थापनेवर असलेले 43 कर्मचारी राज्य सरकारच्या सेवेत कार्यरत आहेत. निवडणूक विभागात 41, पीएमआरडीएकडे 1 आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 1 असे 43 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचा-यांची महापालिका प्रशासनाने माहिती मागविली असून कर्मचा-यांना पुन्हा महापालिका सेवेत घेतले जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर कार्यरत असलेले अनेक कर्मचा-यांना राज्य सरकारच्या विविध विभागांकडून आलेल्या मागणीनुसार त्या विभागात नियुक्‍ती दिली आहे. त्यामध्ये पीएमआरडीए, निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय अशा विविध शासकीय कार्यालयांचा समावेश आहे. ही नियुक्‍ती केवळ काही दिवस अथवा महिन्यांसाठी दिली जाते. मात्र, हे कर्मचारी अनेक वर्षांपासून याच विभागात कार्यरत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती.

  • त्यामुळे प्रशासनाने महापालिकेत आस्थापनेवर असलेले आणि सध्या राज्य सरकारच्या विविध कार्यालयात कार्यरत आहेत, अशा कर्मचा-यांची माहिती मागविली होती. त्यामध्ये 43 कर्मचारी राज्य सरकारच्या सेवेत कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. निवडणूक विभागात 41, पीएमआरडीएकडे 1 आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 1 असे 43 कर्मचारी कार्यरत आहेत.

निवडणूक विभागाकडे सर्वाधिक 41 कर्मचारी कार्यरत आहेत.पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिनही विधानसभा मतदारसंघासाठी हे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये लिपिक, क्रीडा शिक्षक, स्थापत्य सहाय्यक, मजूर, शिपाई यांचा समावेश आहे, अशी माहिती प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.