Pimpri: योग स्पर्धेत श्रेया, स्वरदा, सुशांत, अलका यांना सुवर्णपदक

एमपीसी न्यूज – पंजाब येथे पार पडललेल्या 43 व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्रातील योगपटू श्रेया कंदारे, स्वरदा देशपांडे, सुशांत तरवडे, अलका जाधव यांनी सुवर्णपदकांसह 5 रौप्य, 6 कास्य अशी 15 पदके पटकाविली.

पंजाब, पटियाला येथे योगा फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच ही स्पर्धा झाली. या योगा स्पर्धेत 28 राज्यातील 29 संघातील 1260 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्‌घाटन पटियालाचे महापौर व योगा फेडरेशन इंडियाचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, पंजाब योगाचे अध्यक्ष चंद्रकांत मिश्रा यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाला चौथ्या क्रमाकांवर समाधान मानावे वागले. यामध्ये सोनाली हाडके राष्ट्रीय योगा पंच परिक्षेमध्ये उच्चतम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या.

महाराष्ट्र संघ प्रमुख म्हणून महाराष्ट्र योगा असोसिएशनचे सेक्रेटरी जतिन सोलंकी, उपाध्यक्ष अनिता पाटील, प्रशिक्षक म्हणून चंद्रकांत पांगारे यांनी काम पाहिले. सुशांत तरवडे, श्रेया कंदारे, स्वरदा देशपांडे, अलका जाधव (सुवर्ण), स्वरदा देशपांडे, धनश्री लेकुरवाळे, सायली गटी, विश्वरूपा चटर्जी, समीक्षा महाले, स्वरदा देशपांडे, देवदत्त भारदे (रौप्य), श्रध्दा मुदंडा, तन्वी रेडिज (कास्य) यांनी विविध गटात पदके पटकाविली.

या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धेकांची मार्च 2018 मध्ये झारखंड येथे होणा-या चौथ्या फेडरेशन कपसाठी तर चिली येथे होणा-या 27 व्या जागतिक योगासन स्पर्धेसाठी निवड झाल्याचे संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पांगारे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.