एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 49 कोरोना संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर सकाळी  पॉझिटिव्ह रुग्ण आलेल्या आकुर्डी, जुनी सांगवीतील काही परिसर सील करण्यात आला आहे. महापालिका रुग्णालयात सक्रिय 57 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, पिंपरी-चिंचवड शहरातील 183 आणि शहराबाहेरील 20 अशा 203 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार,  महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचे काही  रिपोर्ट सायंकाळी आले आहेत. त्यामध्ये शहरातील 49 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

सकाळी आकुर्डी, चिंचवड स्टेशन, जुनी सांगवी आणि च-होलीतील प्रत्येकी एकाचे अशा चार जणांचे आणि पुण्यातील गाडीताळ येथील पण वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचे असे पाच जणांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते.

शहरातील सहा रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, 116 जणांनी आत्तापर्यंत कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर, नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल!

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 33
# पॉझिटीव्ह रुग्ण – 05
#निगेटीव्ह रुग्ण – 49
#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 62
#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 120
#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 49
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 203
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 57
# शहरातील कोरोना बाधित सहा रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  9
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 116
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 27343
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 81252

जुनी सांगवी, आकुर्डीतील ‘हा’ परिसर सील!

जुनी सांगवी, आकुर्डी परिसरात आज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सांगवीतील (न्यू युनिटी मेडिकेअर-जयराज रेसिडनसी फेज1-गणेश बेकरी-वाघमारे रोड-हर्षल इलेकॅक्टरीकल्स-शिवगगा कॉम्प्लेक्स), आकुर्डीतील (शुभश्री हौसिंग सोसायटी-जय गणेश हॉटेल-मदिना मशिद-सद्गुरू अपार्टमेंट-आकुर्डी मेन रोड-खंडोबा माळ चौक-आयनोक्स रोड-जय गणेश व्हिजन-हॉटेल अंगण) हा परिसर आज रात्री 11 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.