Pimpri : चार पोलीस ठाण्यातील पाच सराईत तडीपार

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिमंडळच्या हद्दीतील कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिमंडळ एकच्या हद्दीतील पिंपरी, चिंचवड, निगडी आणि भोसरी पोलीस ठाण्यातील पाच सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई आज (बुधवारी) करण्यात आली आहे. एकाच दिवशी पाच गुन्हेगारांना तडीपार केल्याने गुन्हेगारांवर पोलिसांचा चांगलाच वचक निर्माण झाला आहे.

सुरेश ऊर्फ चिम्या शांताराम निकाळजे (वय 42, रा. आदर्शनगर, पिंपरी), चंद्रकांत अनंत माने (वय 26, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवडगाव), सुदर्शन ऊर्फ पिन्या संभाजी राक्षे (वय 22, रा. रामनगर कॉलनी, शास्त्री चौक, आळंदी रोड, भोसरी), सोमनाथ ऊर्फ तम्मा हनुमंत लष्करे (वय 21, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी), निलेश भाऊसाहेब कोळपे (वय 31, रा. शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी तडीपार केलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत.

सराईत गुन्हेगार सुरेश याच्यावर जबरी चोरी, दरोडा, धमकी यासारखे गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

सराईत गुन्हेगार चंद्रकांत माने याच्यावर चोरी, घरफोडी, दरोडा यांसारखे गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

सराईत गुन्हेगार सुदर्शन राक्षे याच्यावर खून यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

सराईत गुन्हेगार सोमनाथ लष्करे याच्यावर गर्दी, मारामारी, गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

सराईत गुन्हेगार निलेश कोळपे याच्यावर जबरी चोरी, दरोडा, धमकी यांसारखे गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

  • कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात पोलिसांचा वचक
    सराईत गुन्हेगार शहरात गुन्हेगारी वर्तुळात राहून उपद्रव पसरवतात. यामुळे शहरातील शांतता भंग होऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडते. यामुळे अशा गुन्हेगारांवर कारवाई करणे गरजेचे आहे. शहरातून एकाच दिवशी पाच गुन्हेगारांना तडीपार केल्याने शहरातील गुन्हेगारी वर्तुळात पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.