Pimpri: शहरात आणखी पाच कोरोना ‘पॉझिटीव्ह’, रुग्णांची एकूण संख्या आठ!

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आणखी पाच कोरोना बाधित रुग्ण असल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची एकूण संख्या आठ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढून 15 तर राज्यातील संख्या 31 वर जाऊन पोहचली आहे. 

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15 झाल्याच्या वृत्तास आज रात्री उशिरा दुजोरा दिला.

पिंपरी-चिंचवडमधील 41 संशयित रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाच नमुने पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमधील चिंता देखील वाढू लागली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका

कोरोना आकडेवारी दृष्टीक्षेपात

  • एकूण ॲडमीट रूग्ण संख्या = 48
  • डिस्चार्ज रूग्ण = 4
  • तपासणीसाठी पाठविलेले नमुने = 48
  •  प्राप्त झालेले तपासणी अहवाल = 12
  •  करोना बाधित रूग्ण = 8
  •  करोना बाधित नसलेले रूग्ण = 4
  •  प्रतीक्षेतील अहवाल = 36

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.