Pimpri: शहरात 5270 सक्रिय रुग्ण; 49 जण गंभीर, 29 रुग्ण व्हेंटिलेटरवर

Pimpri: 5270 active patients in the city; 49 critical, 29 patients on ventilator कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कालपर्यंत केलेल्या दहा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये तब्बल साडेसहा हजार नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या रुग्णसंख्येबरोबर शहरातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आजमितीला 5270 सक्रिय रुग्ण असून त्याचे प्रमाण 37.69 टक्क्यांवर पोहचले आहे. त्यातील 49 जणांची प्रकृती गंभीर आहे. 29 जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर, 8456 रुग्णांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे.

त्याचे प्रमाण 60.48 टक्के आहे. आजपर्यंत 263 जणांचा कोरोनाने बळी घेतला असून मृत्यूदर 1.88 टक्के आहे. दरम्यान, शहरातील 13,981 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण 10 मार्च रोजी सापडला होता. मार्च, एप्रिल आणि अर्धा मे महिना शहरातील परिस्थिती नियंत्रणात होती.

परंतु, अर्धा मे संपल्यानंतर शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. कोरोनाने संपूर्ण शहराला व्यापले आहे. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

झोपडपट्टी, बैठी घरे असलेल्या भागातील रुग्णसंख्येत तर प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णवाढीचा उच्चांक होत आहे. दररोज कमालीची रुग्णवाढ होत आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कालपर्यंत केलेल्या दहा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये तब्बल साडेसहा हजार नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी घट्ट झाली आहे.

लॉकडाऊन उठल्यानंतर त्याचा परिणाम दिसेल असा प्रशासनाचा दावा होता. त्यामुळे आता कोरोनाची साखळी तुटणार का, रुग्णसंख्या आटोक्यात येते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

10 मार्चपासून शहरातील 13,981 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 8456 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्याचे प्रमाण 60.48 टक्के आहे. तर, 5270 सक्रिय रुग्णांवर महापालिका, विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

त्यापैकी 2592 बाधितांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. 783 रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून 49 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 29 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 37.69 टक्के आहे. तर, 263 जणांचा कोरोनाने आजपर्यंत बळी घेतला आहे. त्याचे प्रमाण 1.88 टक्के आहे.

पॉझिटिव्ह पण कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत असे 2592 रुग्ण आहेत. त्याचे प्रमाण 80 टक्के आहे. पण, यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कारण, हे रुग्ण कोरोना ‘वाहक’ होऊ शकतात. याबाबत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सुरुवातीच्या काळात लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. तर, गंभीर रुग्णांची संख्या कमी होती. आता त्यामध्ये वाढ होत आहे. 783 रुग्णांमध्ये लक्षणे आहेत. तर, 49 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.