Pimpri: महापालिका स्थायी समितीची 54 कोटीच्या विकास कामांना मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 54 कोटी 22 लाख चोवीस हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्थायी समिती सभागृहात आज (मंगळवारी) झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. स्थायी समितीच्या सभेत एकूण 43 कामांना मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडील प्रभाग क्रमांक सात मधील भोसरी गावठाण येथील सर्व्हे नंबर एकमध्ये कबड्डी प्रशिक्षण केंद्र विकसित करणे व अनुषंगिक कामे करण्यासाठी 8 कोटी 22 लाख 53 हजार 518 रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्रमांक 3 च-होली येथील सर्व्हे नंबर 301 ते 315 पर्यंत 18 व 24 मीटर डीपी रस्त्याचे उर्वरित काम करण्यासाठी 25 कोटी 4 लाख 34 हजार 414 रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

सभेत ऐनवेळी आठ विषय मांडण्यात आले. त्यासाठी एकूण 13 कोटी 41 रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. त्यामध्ये 11 कोटी रुपये नवीन विकास कामांसाठी तर दोन कोटी रुपये पीएमपीएमएल बस पाससाठी देण्यास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.12 मधील ,रूपीनगर,त्रिवेणीनगर ,तळवडे येथे पेव्हींग ब्लॉक बसविणे आणि दुरूस्ती करणेकामी येणा-या सुमारे 59  लाख 65  हजार रुपयांच्या खर्चास, महापालिका हद्दीतून वाहणा-या पवना नदीपात्रातील हायसिंथ (जलपर्णी) काढून 8 महिने कालावधीत नदीपात्र नियमित स्वच्छ ठेवण्यासाठी ठेवणे कामीयेणा-या सुमारे 36 लाख 86 हजार 781 रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्रमांक चार दिघी येथे स्थापत्य विषयक कामांसाठी 41 लाख 74 हजार 733 रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्रमांक पाच मध्ये गवळीनगर आणि सँडविक कॉलनीमध्ये स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 40 लाख 27 हजार रुपयांच्या खर्चासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.