Pimpri: शहरातील 57 टक्के पुरुषांना तर 43 टक्के महिलांना कोरोनाचा संसर्ग

57 percent of men and 43 percent of women in the city are infected with the corona 4083 पुरुष तर 3070 महिला बाधित

एमपीसी न्यूज – पिपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग पुरुषांना झाला आहे. आजपर्यंत 4083 पुरुषांना तर 3070 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. पुरुषांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण 57 टक्के असून महिलांचे 43 टक्के आहे. पुरुषांमध्ये 22 ते 39 वयोगटातील युवकांचे सर्वाधिक प्रमाण आहे. या वयोगटातील 39 टक्के युवक बाधित आहेत.

कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना मानला जातो. कोरोनाची लागण सर्वाधिक पुरुषांना झाली आहे. महिलांच्या तुलनेत कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण पुरुषांचे जास्त आहे. शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. तेव्हापासून आजपर्यंत 4038 पुरुषांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर, 3070 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. पुरुषांना लागण होण्याचे प्रमाण 57 टक्के आहे. तर, महिलांचे प्रमाण 43 टक्के आहे.

पुरुषांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक विळखा 22 ते 39 वयोगटातील युवकांना झाला आहे. आजपर्यंत या वयोगटातील 2829 युवकांना बाधा झाली आहे. त्याचे प्रमाण 39 टक्के आहे. तर, त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 2025 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे प्रमाण 28 टक्के आहे.

त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 779 तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्याचे प्रमाण 11 टक्के आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 706 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.  त्याचे प्रमाण 10 टक्के आहे.  याशिवाय 60 वर्षापुढील 853 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे प्रमाण 12 टक्के आहे. यामध्ये 57 टक्के पुरुष तर 43 टक्के महिलांना आजपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. महापालिकेने दिलेल्या नकाशातील आकडेवारीनुसार ही टक्केवारीची माहिती आहे. दरम्यान, आज दुपारी चारवाजेपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 7200 वर जाऊन पोहोचली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.