Pimpri: शहरातील एकाच परिवारातील सहा कोरोना संशयित नायडू रुग्णालयात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड परिसरातील एकाच परिवारातील सहा कोरोना संशयित रुग्णांना आज (बुधवारी) पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासले जाणार आहेत.

चीनमध्ये हडकंप माजविलेल्या कोरोनाने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. पुण्यात पाच कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने संशयित रुग्ण आढळल्यास तत्काळ नायडू रुग्णालयात दाखल करावे अशा सूचना दिल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड परिसरातील एक कुटुंब 27 फेब्रुवारीला दुबईवरुन परत आले होते. स्थानिक डॉक्टरांनी त्यांचे नमुने तपासले. त्यात संशयित आढळले आहेत. त्यामुळे त्यांना आज तत्काळ पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासले जाणार आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकांनी विनाकारण एकत्र येणे टाळावे. शेकहँड करु नये, असे आवाहन केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.