Pimpri : रक्तदान शिबिरात 60 जणांचा सहभाग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील रोटरी क्लबच्या सात क्लबतर्फे आज रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण 60 जणांनी सहभाग घेतला.

पिंपरीतील रोटरी कम्युनिटी सेंटर येथे हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात रोटरी क्लब ऑफ निगडी, रोटरी क्लब ऑफ आकुर्डी, रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन, रोटरी क्लब ऑफ निगडी- प्राधिकरण,रोटरी क्लब ऑफ पीसीएमसी इंडस्ट्रियल टाऊन, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांनी केले होते. या शिबिराचे उदघाटन माजी प्रांतपाल विवेक आराना यांच्या हस्ते करण्यात आले.

  • यावेळी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष विजय काळभोर, रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचे अध्यक्ष जिग्नेश आगरवाल, रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष बाळकृष्ण उ-र्हे, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी अॅड. सोमनाथ हरपुडे, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण बहार शहा, रोटरी क्लब ऑफ पिंपरी कृष्णा सिंगल, रोटरी क्लब ऑफ पीसीएमसी इंडस्ट्रियल टाऊनचे अध्यक्ष जसविंदर सोखी आदी उपस्थित होते. शिबिराचे आयोजन रोटरी क्लबच्या शाखांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.