Pimpri : आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात विविध सामाजिक संस्थांच्या वतीने  ६० देशी झाडांचे वृक्षारोपण 

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहरातील आज विविध सामाजिक संस्थाच्यावतीने आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात ६० देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. 

या सामाजिक उपक्रमांत पीसीसीएफ, सन्मित्र फाऊंडेशन संचलित पोलीस मित्र संघटना, देवराई फाऊंडेशन तर्फे वृक्ष देण्यात आले. देवराई फाऊंडेशने वृक्षारोपणसाठी देशी ६० झाडे दिली होती. त्यामध्ये जंगली बदाम, सातविन, पळस, कडुलिंब, बहावा, काटेसावर, तामण, अर्जुन, पिचकारी, बकुळ, वावळ, मोहगनी आदी वृक्ष लावण्यात आले.

यावेळी नगरसेवक व माजी स्थायी समिती सदस्य़ अमित गावडे, नगरसेविका शर्मिला बाबर, आकुर्डी रेल्वेस्टेशन प्रबंधक रतन रजक, राजेंद्र गाडेकर, जे. एन. गुप्ता, गौरव झा, दिपक भालेराव, जॉय जॉर्ज, सुनील मिश्रा आदी उपस्थित होते.

आकुर्डी रेल्वे स्टेशन प्रबंधक रतन रजक यांनी या उपक्रमांसंदर्भात पुढाकार घेतला. वृक्षारोपण उपक्रमांत भावसार व्हिजन, सावरकर मंडळ निसर्ग मित्र विभाग, थेरगाव सोशल फाऊंडेशन, रॉबीनहूड आर्मी, निगडी-प्राधिकरण रेसिडेन्स फोरम, निसर्ग राजा मित्र जीवाचे, दीक्षा एनजीओ, तनपुरे फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, संदीप भागवत ग्रुप, आंघोळीची गोळी, पवना जल मैत्री अभियान, दुर्गमित्र, नाम फाऊंडेशन पिंपरी-चिंचवड, निगडी- प्राधिकरण अतिक्रमण मुक्त ग्रुप या संस्थानी वृक्षारोपण करम्यात पुढाकार घेतला होता. पिंपरी-चिंचवड सीटीझन फोरम, सन्मित्र संचिलत पोलीस भावसार आदींनी आयोजन केले.

कार्यक्रमाचे संयोजन लाला माने, हृषिकेश तपशाळकर, राजीव भावसार, धनंजय शेडबाळे, अनिल पालकर, रतन रजक आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.