Pimpri: परदेशातून आलेले 613 जण ‘होम क्वॉरंटाईन’मध्ये

एमपीसी न्यूज – परदेशातून प्रवास करुन पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या  613 जणांना ‘होम क्वॉरंटाईन’मध्ये (वेगळ्या कक्षात) ठेवण्यात आले आहे. तर, आजपर्यंत 105 जणांच्या घशातील द्रावाचे नुमने ‘एनआयव्हीकडे’ तपसणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील 12 जण पॉझिटीव्ह आढळले असून त्यांच्यावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निगेटिव्ह अहवाल आलेल्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, महापालिकेच्या सर्वेक्षण टीमने बाधित रुग्ण असलेल्या परिसरातील 74 हजार 998 घरांमधील दोन लाख 49 हजार 218 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. याबाबतची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.  

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नवीन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत एकुण 105 व्यक्तींचे कोरोनाकरीता घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. शहरातील कोरोना बाधित रुग्ण 12 असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालयांमधील ‘आयसोलेशन’ कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. तिघांपैकी दोघाचे अहवाल निगेटीव्ह आले असून एकाचा अहवाल येणे बाकी आहे.

कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या 244 कर्मचा-यांची क्षेत्रीय सर्वेक्षण टिम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करित आहेत. आजअखेर शहरातील  74 हजार 998 घरांमधील दोन लाख 49 हजार 218 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेले 613 जण ‘होम क्वॉरंटाईन’मध्ये ठेवण्यात आले आहे. या रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेच्या 100 टीम कार्यन्वित आहेत.

परदेश प्रवास करुन चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कतार, ओमान, कुवेत आणि युनाटेड अरब अमिरात या देशांमधुन आलेल्या सर्व नागरिकांनी किमान 14 दिवस स्वत:हून  ‘होम क्वॉरंटाईन’मध्ये रहावे. या देशांमधून प्रवास करुन आलेल्या नागरिकांनी याबाबतची माहिती आपल्या घराजवळील महापालिकेच्या दवाखाना किंवा रुग्णालयात तातडीने द्यावी असे आवाहनही आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे.

महापालिकेचा हेल्पलाईन क्रमांक 8888006666  हा आहे. तसेच 9922501450 हा व्हॉट्सअॅप क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे. राज्य शासनामार्फत कार्यान्वित idsp.mkcl.org या संकेतस्थळावर संशयित कोरोना रुग्ण संबंधित माहिती देण्याचे आवाहन नागरीक, वैद्यकीय व्यावसायिक यांना करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.