Pimpri: पवना धरण क्षेत्रात तब्बल 650 मिलीमीटर पाऊस कमी, शहरवासीयांवर पाणी कपातीचे संकट कायम

Pimpri: 650 mm less rain in Pavana dam area, possibility of Crisis of daytime water cut continues on city dwellers यंदा पावसाने देखील ओढ दिली आहे. पवना धरणा पाणलोट क्षेत्रात 1 जूनपासून आज 15 जुलैपर्यंत फक्त 425 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

एमपीसी न्यूज (गणेश यादव)- पावसाळा सुरु होईन दीड महिना उलटला तरी पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला नाही. 1 जूनपासून आज 15 जुलैपर्यंत दीड महिन्यात धरण परिसरात केवळ 425 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी आजच्या तारखेला तब्बल 1075 मिली मीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा तब्बल 650 मिमी कमी पाऊस झाला आहे. आजमितीला धरणात 34.18 टक्के पाणीसाठा म्हणजेच दोन महिने पुरेल एवढा हा साठा आहे. दरम्यान, 25 नोव्हेंबर 2019 पासून एकदिवसाआड सुरु असलेले पाणी कपातीचे संकट पिंपरी-चिंचवडकरांवर यापुढेही कायम राहण्याची चिन्हे आहेत.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पिंपरी-चिंचवडकर मागील साडेआठ महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात आहेत. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत 25 नोव्हेंबर 2019 पासून पहिल्यांदा दोन महिन्यांसाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता.

दोन महिन्याचा कालावधी 25 जानेवारी 2020 रोजी संपल्यानंतर देखील दिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवण्यात आला. ‘जोपर्यंत 30 एमएलडी जादा पाणी मिळत नाही. तोपर्यंत एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम’ राहणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे.

जादाचे 30 एमएलडी पाणी अद्यापपर्यंत उपलब्ध झाले नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकांना यंदाच्या पावसाळ्यात देखील एकदिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागण्याची दाट चिन्हे आहेत.

त्यात यंदा पावसाने देखील ओढ दिली आहे. पवना धरणा पाणलोट क्षेत्रात 1 जूनपासून आज 15 जुलैपर्यंत फक्त 425 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात केवळ तीन मिमी पाऊस झाला आहे. 1 जून पासून 5.84 टक्क्यांनी पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

धरणात 34.18 टक्के पाणीसाठा आहे. तर, गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत 1075 मिमी पावसाची नोंद झाली होती.

पाणीसाठा 42.18 टक्के होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पवना धरण पाणलोट क्षेत्रात तब्बल 650 मिमी कमी पाऊस झाला आहे. तर, 8 टक्क्यांनी धरणात पाणीसाठा कमी आहे. आज धरणात 34.18 टक्के पाणीसाठा असून हा पाणीसाठा दोन महिने पुरले एवढा आहे.

गतवर्षीपेक्षा यंदा 650 मिली मीटर कमी पावसाची नोंद – गडवाल

याबाबत ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना पवना धरणाचे शाखा अभियंता एम.ए. गडवाल म्हणाले, ”धरण पाणलोट क्षेत्रात 1 जून पासून ते 15 जुलैपर्यंत 425 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासात फक्त तीन मिमी पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आजपर्यंत 5.84 टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. आजमितिला धरणात 34.18 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी 15 जुलैपर्यंत पाणलोट क्षेत्रात तब्बल 1075 मिमी पावसाची नोंद झाली होती.

तर, धरणात 42.18 टक्के पाणीसाठा होता. गेल्यावर्षी 600 मिमी जास्त पाऊस झाला होता. जून महिना संपला. आज जुलैची 15 तारीख आहे. या दीड महिन्यात पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला नाही.

पावसाळ्याच्या चार महिन्यातील पहिल्या दीड महिन्यात केवळ 425 मिमी पाऊस झाला आहे. 20 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत पाऊस होईल अशी आशा आहे”, त्यांनी व्यक्त केली.

”धरणात आजमितीला 34.18 टक्के पाणीसाठा असून दोन महिने पुरेल एवढा हा साठा आहे. सध्या पाण्याची काटकसर करण्याची आवश्यकता नाही. लॉकडाउन असल्याने नागरिक घरी आहेत. उद्योग बंद आहेत.

पण, घरगुती पाणीवापर वाढला आहे. लॉकडाउनमध्ये नागरिकांना पाणी कमी पडू दिले नाही. मार्चपासून नागरिकांना पाण्याची कमतरता भासू दिली नाही. या कालावधीत 7 ते 8 टक्के जास्त पाणी सोडल्याचे”ही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.