pimpri: दिवसभरात 7 जण कोरोनामुक्त, 123 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह; सांगवीतील परिसर ‘सील’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सात जण आज (शनिवारी) कोरोनामुक्त झाले, तर, कोरोना संशयित 123 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे ही दिलासादायक बाब मानली जात आहे. तर, सांगवीतील काही परिसर सील करण्यात आला आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कोरोना संशयितांचे रिपोर्ट तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 123 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. शहरातील 115 आणि शहराबाहेरील पण महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत अशा 8 रुग्णांसह 123 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

शहरातील तीन आणि शहराबाहेरील रहिवासी पण वायसीएम उपचार घेताना दोन अशा पाच जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महापालिका रुग्णालयात 50 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत 49 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भोसरी, च-होलीतील सात रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल !

# दाखल झालेले संशयित रुग्ण – 146

# पॉझिटीव्ह रुग्ण – 02

# निगेटीव्ह रुग्ण – 123

# चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 98

# रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 158

# डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 130

# आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 123

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 50

# शहरातील कोरोना बाधित 10 रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  5

# आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 49

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 16386

# दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 52107

जुनी सांगवीतील हा परिसर ‘सील’!

सांगवी परिसरात कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे मधुबन सोसायटी, जुनी सांगवी-कामटे फुड सर्व्हिसेस-श्री पॉलिक्लिनिक-महा ई सेवा केंद्र-महाराज वाईन्स-स्पायसर कॉलेज रोड-स्पायसर पुल-मुळा नदी-सी.क्यू.ई.बॉर्डर) गांगुर्डेनगरस शिरोडे रोड-पिंपळेगुरव (विमल इलेक्ट्रिकल शिरोडे रोड-पाण्याची टाकी-मराठी शाळा-कृतीका एॅक्वा-एॅक्सीस बँक एटीएम-युनाटेड डायग्रोस्टिक सेंटर-चंदन टी हाऊस-विमल इलेक्ट्रीकल) हा परिसर पुढील आदेशापर्यंत या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.