Pimpri: येरवड्यातील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा कोरोनामुळे ‘वायसीएमएच’मध्ये मृत्यू; कोरोना बळींची संख्या 15 वर

Pimpri: 71-year-old senior citizen of Yerwada dies in YCMH due to corona; Corona's death toll rises to 15

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पुण्यातील येरवडा परिसरातील कोरोना बाधित ज्येष्ठ नागरिकाचा काल (मंगळवारी) रात्री उशिरा मृत्यू झाला आहे. त्यांचे वय 71 होते. दरम्यान, कोरोनामुळे शहरातील सहा आणि पुण्यातील पण वायसीएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नऊ अशा 15 जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

येरवडा परिसरातील रहिवासी असलेल्या पुरुष रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम  रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना कोरोनाव्यतिरिक्त मधुमेहाचा आजार होता. यामुळे  कोरोना बळींचा आकडा 15 वर पोहचला आहे.

दरम्यान, 12 एप्रिल रोजी थेरगाव भागातील एका पुरुषाचा, 20 एप्रिल रोजी निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि  24 एप्रिल रोजी  निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, 29 एप्रिल रोजी खडकीतील एका महिलेचा, 6 मे रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील महिलेचा आणि येरवडा येथील एका महिलेचा  वायसीएम रुग्णालयात,  भोसरीतील पुरुष रुग्णाचा 10 मे रोजी, 11 मे रोजी पुण्यातील वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या पुरुष रुग्णाचा आणि 15 मे रोजी पुण्यातील वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या तीघांचा तर  19 मे रोजी भोसरीतील दोघांचा आणि 19 मे रोजीच रात्री उशिरा येरवड्यातील एका पुरुष रुग्णाचा अशा 15 जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.