Pimpri : उद्योगनगरीमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

एमपीसी न्यूज- उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये विविध शिक्षण संस्था, सामाजिक संस्थांच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने पिंगळे गुरव येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. नगरसेवक सागर आंघोळकर,स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, शशिकांत कदम, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामचंद्र कदम, सचिव जालिंदर दाते, उपाध्यक्ष बबन रानडे, कार्याध्यक्ष येळवे, गुणवंत कामगार संगीता जोगदंड, मनोज खैरनार, एस,डी विभुते, दिव्यांग संस्थेच्या मोना कुलकर्णी उपस्थित होते.

सर्व भारतीय नागरिकांनी आपण सर्व प्रथम भारतीय आहोत हे लक्षात घेऊन सर्वांनी एकोप्याने गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे असे आवाहन अण्णा जोगदंड यांनी केले. नगरसेवक सागर आंघोळ यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने वर्षभर राबविलेले उपक्रमाचे कौतुक केले. नगरसेवक शशीकांत कदम यांनी आपले विचार व्यक्त केले. केंद्र संचालक प्रदीप बोरसे यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. व कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांचा कामगारानी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दीपस्तंभ संस्थेच्या दिव्यांग मुलांनी देशभक्तीपर गीते सादर केली.यावेळी लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी कामगार कल्याण केंद्र उद्योगनगर येथे रक्तदान शिबिर भरवण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन टाटा मोटर्सचे व्यवस्थापक सुरेश कोरडे, कामगार कल्याण केंद्र उद्योगनगरचे संचालक बाळासाहेब गायकवाड, अभिनेत्री रुपाली पाथरे यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरात 42 जणांनी रक्तदान केले. पिंपरी चिंंचवड ब्लड बँक यांनी रक्त संकलनासाठी सहकार्य केले. रक्तदान शिबिराचे आयोजन संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड आणि सभासदांनी केले.

नवी सांगवी येथील समतानगर मित्र मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा झाला. ज्येष्ठ नागरिक अरविंद मांगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, उपाध्यक्ष हनुमंत पंडित, सचिव सुनील कोकाटे, प्रताप देवडकर, एस.डी.विभुते, जतिन जेतवन, वसंतराव चकटे उपस्थित होते.

गणेशखिंड रस्त्यावरील मॉडर्न हायस्कूलमध्ये 71 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शौर्यचक्र विजेते शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा कुणाल गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला मेजर कुणाल यांची मुलगी ऊमंग गोसावी उपस्थित होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.