Pimpri : रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या शिबिरात 75 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणतर्फे थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिरासाठी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे अध्यक्ष बहार शहा, प्रोजेक्ट डायरेक्टर शैलेश बोकील, डॉ. महेश पाटील, नगरसेविका शर्मिला बाबर, अनुराधा गोरखे, शैलजा मोरे, डॉ. सत्यजित पाटील आदी उपस्थित होते.

थॅलेसेमिया हा अनुवांशिकतेने होणारा जनुकीय आजार आहे. यामध्ये रुग्णाच्या रक्तातील हिमोग्लोबिन खूपच कमी असते आणि तांबडय़ा रक्तपेशींची संख्याही सर्वसाधारण कमी असते. प्राणवायू वाहून नेण्यासाठी तांबड्या पेशींत हिमोग्लोबीन मुबलक प्रमाणात असणे गरजेचे आहे.

शरीरात हिमोग्लोबीन नसल्यामुळे शरीराला गरजेइतकाही प्राणवायू मिळत नाही. प्राणवायूची गरज पूर्ण न झाल्याने रुग्णाच्या मृत्यूचाही धोका संभवतो. यामुळे या आजारात दर 15 दिवसांनी रक्त द्यावे लागते.

थॅलेसेमिया रुग्णांच्या मदतीसाठी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदान केल्याने शरीरात नवीन रक्ताची निर्मिती होते. रक्तदान केल्याने जेवढा फायदा गरजूंना होतो. त्यापेक्षा अधिक फायदा रक्तदात्याला होतो. रक्तदानाच्या चळवळीत जोडून अनोखे समाजकार्य करण्याची संधी यानिमित्ताने नागरिकांना मिळते, असे अध्यक्ष बहार शहा म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.