Pimpri: शहरातील 79 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह; एकाला डिस्चार्ज; आजपर्यंत 69 जणांना कोरोनाची लागण

सक्रिय रुग्णांची संख्या पोहचली 48 वर; 21 रुग्ण कोरोनामुक्त; तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीबाहेरील पण महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल असलेल्या 39 वर्षीय पुरुषाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, 79 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून कोरोनामुक्त झालेल्या एकाला आज (गुरुवारी) डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 69 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 48 झाली असून 21 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, तिघांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी महापालिका हद्दीबाहेरील पण महापालिका रुग्णालयात दाखल असलेल्या एकाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. या पुरुष रुग्णाचे वय 39 असून त्याला कोरोनाची लागण झाली आहे. तर, भोसरी परिसरातील रहिवासी असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचे 14 दिवसानंतरचे आणि त्यानंतरच्या 24 तासाचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 21 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल!
#दाखल झालेले संशयित रुग्ण – 80
# पॉझिटीव्ह रुग्ण – 01
#निगेटीव्ह रुग्ण – 79
#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 80
#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 117
#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 80
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 69
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 48
# शहरातील कोरोना बाधित नऊ रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 3
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 21
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 18599
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 58954

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.