Pimpri : Good News ! 81 वर्षीय आजोबांनी जिंकली कोरोनाची लढाई!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल असणाऱ्या कोरोना बाधित रूग्णांवर रुग्णालयातील डॉक्टर्सच्या अथक परिश्रमाला यश आले आहे. 81 वर्षांच्या आजोबांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. तसेच 30 वर्षाच्या युवकालाही आज डिस्चार्ज देण्यात आला.

वायसीएमएचचे वैद्यकिय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे व मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण सोनी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने कोरोना बाधित या रूग्णांवर उपचार केले.

दोन्ही रूग्णांची स्थिती खालावलेली असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तथापि, डॉक्टरांनी केलेले योग्य उपचार व परिश्रमाने रूग्णांना बरे करण्यात यश आले.

14 दिवस रूग्णालयात उपचार केल्यानंतर आज त्यांना रूग्णालयातून सोडले आहे. त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आल्या. हे दोन्ही रूग्ण पुण्यातील रहिवासी होते.

या रुग्णांना घरी सोडताना निरोप देण्यात आला. यावेळी डॉ. किशोर खिल्लारे, डॉ. अनिकेत लाठी, डॉ. स्मिता पानसे, डॉ. कौस्तुभ कहाने, डॉ. अभयचंद्र दादेवार, डॉ. अक्षय शेवाळे, डॉ. वालिद , परिचारिका सुर्वे, संगीता पाटील आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.