Pimpri : अण्णा बनसोडे यांना 86 हजार, चाबुकस्वार यांना 67 हजार तर, ‘नोटा’ला 3240 मते

वंचित बहुजन आघाडी तिसऱ्या स्थानावर; भाजपचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब ओव्हाळ यांना ९३५ मते

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बनसोडे यांचा १९ हजार ७७८ एवढ्या मतांनी विजय झाले आहेत. अण्णा बनसोडे यांना ८६ हजार ९८५ , महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांना ६७ हजार ९५ मते मिळाली आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बाळासाहेब गायकवाड १३ हजार ६८१ मते घेऊन तिसऱ्या स्थानावर राहिले. तर, भाजपचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब ओव्हाळ यांना ९३५ इतकी मते मिळाली. तर, ३२४० इतकी मते ‘नोटा’ अर्थात ‘वरीलपैकी कोणाही नाही’ला मिळाली आहेत.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ५३ हजार ६८८ मतदार आहेत. जनतेने ६८ हजर मते देत अण्णा बनसोडे यांना कौल दिला. उमेदवारांना मिळालेली मतेपुढील प्रमाणे :

उमेदवार आणि मिळालेली मते. (पोस्टल मते) :
अण्णा बनसोडे – ८६८७३ आणि पोस्टल ११२
अॅड. गौतम चाबुकस्वार- ६७०९५आणि पोस्टल ८२
बाळासाहेब गायकवाड – १३६८१ आणि पोस्टल ०
धनराज गायकवाड – १२१२ आणि पोस्टल १
गोविंद हेरोडे- २६२ आणि पोस्टल १३
संदीप कांबळे – २५४ आणि पोस्टल-०
अजय गायकवाड – ४६१ आणि पोस्टल-०
अजय लोंढे – २८७ आणि पोस्टल-१
अॅड.आनंद ओव्हाळ – २९५ आणि पोस्टल-१
चंद्रकांत माने -२१२आणि पोस्टल-०
दिपक जगताप- २९५ आणि पोस्टल-०
दिपक ताटे – ४३०आणि पोस्टल-०
नरेश लोट – १५५ आणि पोस्टल-०
बाळासाहेब ओव्हाळ – ९३५ आणि पोस्टल-१
मिना खिलारे – ३०५ आणि पोस्टल-०
युवराज ढकाले- -४८२ (०)
डॉ. राजेश नागोजे- ३४८ (२)
हेमंत मोरे – ५६८ (०)
नोटा- ३२४० (६)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.