Pimpri: सध्या 3009 ‘अ‍ॅक्टीव्ह होम क्वारंटाईन’ तर 2110 ‘पॅसिव्ह’ होम क्वारंटाईन

Pimpri: 8972 Home Quarantine, 3848 Quarantine Free to date; Currently 3009 'active' and 2110 'passive' home quarantine

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यापासून आजपर्यंत 8972 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी 3848 जणांचा 28 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्याने ते क्वारंटाईन मुक्त झाले आहेत. तर, आजमितीला 1 ते 14 दिवसांसाठी 3009 जण ‘अ‍ॅक्टीव्ह’ होम क्वारंटाईन आहेत. त्यांच्यावर महापालिका देखरेख ठेवते. तर, पॅसिव्ह म्हणजे 14 ते 28 दिवसांसाठी 2110 जण ‘होम क्वारंटाईन’ आहेत. त्यांनी होम क्वारंटाईन असल्याबाबत महापालिकेला माहिती देणे आवश्यक आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण शहरातील होता. पहिले 12 रुग्णही परदेशातून आले होते. त्यामुळे महापालिकेने परदेशातून आलेले नागरिक, त्यांच्या कॉन्टॅक्टमधील, निगेटीव्ह रिपोर्ट आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली. आजपर्यंत शहरातील 8 हजार 972 नागरिकांना  ‘होम क्वारंटाईन’ केले होते.

त्यातील 28 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पुर्ण झालेल्यांना मोकळे केले जाते. पहिल्यांदा 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी होता. त्यामध्ये वाढ करत 28 दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी केला आहे. आजपर्यंत 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेले 3 हजार 848 जण होम क्वारंटाईन मुक्त झाले आहेत.

सध्या 1 ते 14 दिवसांसाठी शहरातील 3009 जण अ‍ॅक्टिव्ह होम क्वारंटाईन आहेत. त्यांच्यावर महापालिका देखरेख ठेवते. तर,  14 दिवसानंतर 28 दिवसांसाठी  होम क्वारंटाईन असलेल्यांना पॅसिव्ह क्वारंटाईन संबोधले जाते. आजमितीला 2110 नागरिक पॅसिव्ह होम क्वारंटाईन आहेत. त्यांनी होम क्वारंटाईन असल्याची, काही त्रास होत असेल तर स्वत:हून महापालिकेला माहिती देणे अपेक्षित आहे.

शहरातील 3848 जण ‘होम क्वारंटाईन’ मुक्त – अतिरिक्त आयुक्त  

याबाबत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला पॉझिटीव्ह रुग्ण सापडला होता. तेव्हापासून परदेशवारी करुन शहरात आलेले नागरिक, त्यांच्या कॉन्टॅक्टमधील,  निगेटीव्ह रिपोर्ट आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली होती. आजपर्यंत 8972 नागरिक होम क्वारंटाईन झाले होते. त्यापैकी 3848 जणांचा क्वारंटाईनचा 28 दिवसांचा कालावधी संपला आहे. त्यामुळे ते क्वारंटाईन मुक्त झाले आहेत. तर, आजमितीला 14 दिवसांसाठी 3009 जण अ‍ॅक्टीव्ह तर  14 दिवसानंतर पुढील 28 दिवसांसाठी 2110 जण पॅसिव्ह ‘होम क्वारंटाईन’ आहेत. होम क्वारंटाईन नागरिकांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत राहते’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.