Pimpri: महापालिकेच्या 15 शाळामध्ये सुरू होणार आठवीचे वर्ग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 15 शाळांमध्ये सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत. शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर तब्बल 6 वर्षांनी निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी शिक्षण समितीसमोर ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य शासन निर्णयानुसार 2014-15 या शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विद्यार्थ्याला जवळच्या शाळेत आठवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून याबाबत 6 वर्षांपासून कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर यंदा 15 शाळांनी आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत तयारी दर्शविली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून पालिकेच्या 15 शाळांमध्ये आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत.

सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, तसा प्रस्ताव मंजुरीसाठी शिक्षण समितीकडे ठेवण्यात आला आहे. त्यानुसार उपलब्ध वर्ग खोल्या आणि शिक्षकांवरही हा भार टाकण्यात आला आहे. शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर तब्बल 6 वर्षांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये विद्यार्थ्यांना 1 किलोमीटरपर्यंत शाळा नसलेल्या पूर्व प्राथमिकला पाचवीची तुकडी, तर 3 किलोमीटरपर्यंत शाळा नसलेल्या पाचवी ते सातवीच्या वर्गांना आठवीची तुकडी जोडण्याचे निकष आहेत. त्यानुसार पालिकेच्या शाळांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. तसेच पूर्व प्राथमिकमधील 30 विद्यार्थ्यांसाठी एक, तर उच्च प्राथमिकसाठी 35 विद्यार्थ्यांसाठी एक याप्रमाणे वाढीव तुकड्यांना शिक्षक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शिक्षण समितीच्या निर्णयानंतर वर्ग सुरू करण्यात येतील, अशी माहिती प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिली.

या शाळांमध्ये सुरू होणार आठवीचे वर्ग

माता रमाबाई भीमराव आंबेडकर प्राथमिक विद्यालय अजंठानगर-चिंचवड मुले, पुनावळे कन्या प्राथमिक शाळा,पुनावळे, विकासनगर प्राथमिक शाळा, तळवडे प्राथमिक शाळा, मोशी प्राथमिक कन्या शाळा, हुतात्मा भगतसिंग विद्यामंदिर, मुले प्राथमिक शाळा क्रमांक 37 दापोडी, वसंतदादा पाटील, आकुर्डी, मुले, प्राथमिक शाळा क्रमांक 1, दापोडी कन्या प्राथमिक शाळा क्रमांक 31, अण्णासाहेब मगर कन्या प्राथमिक शाळा, बोर्‍हाडेवाडी भोसरी, रावेत प्राथमिक शाळा, दिघी कन्या प्राथमिक शाळा क्रमांक 2, दिघी मुले प्राथमिक शाळा क्रमांक 2, जाधववाडी कन्या शाळा, जाधववाडी मुले, मनपा शाळा रहाटणी कन्या शाळा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.