Pimpri: शहरात आज 946 नवे रूग्ण, 448 जणांना डिस्चार्ज, 20 मृत्यू

सध्या 5 हजार 853 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. : 946 new patients in the city today, 448 discharged, 20 deaths

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात गुरूवारी कोरोनाचे 946 नवे रूग्ण आढळले. त्यामुळे शहरातील कोरोनाची रूग्ण संख्या 32 हजार पार झाली आहे. उपचार पूर्ण झालेल्या 448 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर, 20 जणांचा मृत्यू झाला.

शहरातील 32 हजार 565 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. शहरात गुरूवारअखेर 22 हजार 453 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत 662 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मनपा हद्दीतील 538 तर 124 मनपा हद्दीबाहेरील आहेत. सध्या 5 हजार 853 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

गुरूवारी 1 हजार 897 संशयित रूग्णांना महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. आज 1 हजार 454 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 1 हजार 237 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. 20 जणांचा मृत्यू झाला. शहरातील 18 हजार 578 घरांना भेटी देऊन 59 हजार 229 जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.

आज 20 मृत्यू झाले. त्यात काळभोरनगर (पुरुष 76 वर्षे), नेहरुनगर (स्त्री 70 वर्षे), रहाटणी (स्त्री 53 वर्षे, स्त्री 75 वर्षे), खराळवाडी (पुरुष 48 वर्षे), निगडी (पुरुष 72 वर्षे), चिखली (पुरुष 70 वर्षे),भोसरी (स्त्री 60 वर्षे, पुरुष 60 वर्षे), काळेवाडी (स्त्री 85 वर्षे), चिंचवड (पुरुष 53 वर्षे),वाल्हेकरवाडी (पुरुष 80 वर्षे), यमुनानगर (स्त्री 69 वर्षे),लोणावळा (पुरुष 65 वर्षे), धायरी (पुरुष 73 वर्षे), आळंदी (पुरुष 65 वर्षे), मुळशी (पुरुष 50
वर्षे), देहूरोड (स्त्री 68 वर्षे), मरकळगाव (पुरुष 36 वर्षे), जुन्नर (पुरुष 64 वर्षे) येथील रहिवासी आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.