Pimpri : वात्सल्य संस्थेस ‘एक मुठ्ठी अनाज’ उपक्रमातून 400 किलो धान्य भेट

जैन सोशल डायमंड अँक्टिव्हीटी ग्रुप आणि प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचा उपक्रम

एमपीसी न्यूज – येलवाडी येथे आज जैन सोशल डायमंड अँक्टिव्हीटी ग्रुप आणि प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने “एक मुट्ठी अनाज” या सामाजिक उपक्रमाद्वारे पिंपरी चिंचवड़ शहरात जमा केलेले 400 किलो धान्य संस्थेचे संचालक यांचेकडे सुपूर्त केले. यामध्ये गहु, तांदूळ, साखर, 15 किलो शुद्ध गोड़ेतेल, कडधान्य, हरबरा आणि मुगडाळ आदींचा समावेश आहे.

यावेळी प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती अध्यक्ष विजय पाटील, अर्चना घाळी, दाभोळकर जैन सोशल अँक्टिव्हीटी ग्रुपचे संतोष छाजेड़, विजय मुनोत, विजय नहार, राजेन्द्र कटारिया, पारस लोढ़ीया, बाबासाहेब घाळी, कुमारी खुशी लोढ़ीया संस्थेचे कार्यवाह उपस्थित होते.

  • पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वंचित घटकांना जीवनावश्यक वस्तुंची मदत करण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती आणि जैन सोशल डायमंड ग्रुपच्या वतीने शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम सुरु केले आहेत. त्याअंतर्गत जमा झालेले धान्य विविध गरजू संस्थाना प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी वाटले जाते.

या महिन्यामध्ये एम्पायर एस्टेट सोसायटी चिंचवड़मधील जयादेवी महिला मंडळ तसेच एचडीएफसी कॉलनी महिला मंडळाने विशेष योगदान दिले. देहु येलवाडी येथील वात्सल्य संस्थेत सध्या 18 दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. लोक मदतीचाच संस्थेला मुख्य आधार आहे. सदयस्थितित संस्थेला खाद्यसामुग्रीची नितांत आवश्यकता होती. त्यानुसार दोनही संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना धान्याची मदत देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.