Pimpri : घरात घुसून सासू सुनेला मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

A case has been registered against the person who broke into the house Beating mother-in-law ; ही घटना 13 जुलै रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता विद्यानगर, चिंचवड येथे घडली.

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे घरात घुसून सासू-सुनेला मारहाण केली. तसेच घरातील सामानाची तोडफोड केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 जुलै रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता विद्यानगर, चिंचवड येथे घडली.

हिरजा भवरसिंग राजपूत (वय 60, रा. विद्यानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी गब्बर येवस्था पवार (वय 47, रा. विद्यानगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जुलै रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता आरोपी पवार हा फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने घुसला. त्याने घरातील टीव्ही आणि कपाटाची तोडफोड केली.

त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या सुनेला हाताने मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाल्या.

त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.