Pimpri : ताबा दिलेल्या फ्लॅटचे खोटे दस्त करत काढले कर्ज, दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- विक्री झालेल्या फ्लॅटचा ताबा दिलेला असतानाही (Pimpri) खोटे दस्त करत संबंधित फ्लॅटवर कर्ज काढत ग्राहकाची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार नऊ मार्च 2016 रोजी पिंपरी महापालिकेच्या दुय्यम निबंधक कार्यालयात घडला आहे.
याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली असून हितेश गिरीश बंगाली (वय 40 रा.घाटकोपर मुंबई) व महिला आरोपी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Alandi : बालविवाह प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना हडपसर येथील फेली सोसायटी मध्ये फ्लॅट क्रमांक 101 व 102 यांची विक्री करत ताबा दिला होता असे असतानाही आरोपींनी फिर्यादी यांच्या परस्पर पिंपरी महापालिकेच्या दुय्यम निबंधक कार्यालयात फ्लॅटचे खोटे दस्त तयार करत त्या दस्ता द्वारे फ्लॅटवर दोन कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले .
आरोपी महिला यांनीही कोणतीही शहानिशा न करता आरोपी हितेशाला कर्ज दिले. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस पुढील तपास (Pimpri) करत आहेत.