Pimpri : वायसीएम परिसरात मृत अर्भक टाकल्या प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम)परिसरात एका कचरा कुंडीजवळ शनिवारी (दि. 27) मृत अर्भक (Pimpri )सापडले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी सफाई कामगार सुशील दामोदर भालेराव (वय 38, रा. पिंपळे गुरव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : सी-डॅक ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड व्हर्च्युअल रियालिटी’ विषयावरील अभ्यासक्रम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वायसीएम येथे सफाईचे काम करतात. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास ते हॉस्पिटलच्या मायनस गेटजवळ सफाईचे काम करत होते. त्यावेळी त्यांना कचरा कुंडीजवळ स्त्री जातीचे अर्भक सापडले. त्यांनी तत्काळ हॉस्पिटल प्रशासनाला याबाबत माहिती दिली.

पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्भक ताब्यात घेतले. अज्ञाताने अर्भकाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तसेच अपत्य जन्माची लपवणूक करण्यासाठी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अर्भक फेकून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास (Pimpri ) करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.