Pimpri : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – लहान बहिणीला मारहाण करणाऱ्यास रोखण्यासाठी गेलेल्या महिलेला व तिच्या पतीला दगडाने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 18) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास एक कॉर्नर, पिंपरी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

शारदा दीपक जोशी (वय 30, रा. पीसीएमसी कॉलनी, निगडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विनायक अनिल आवळे (वय 24, रा. काळेवाडी, पिंपरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास आरोपी विनायक हा शारदा यांच्या लहान बहिणीला मारहाण करीत होता. त्यामुळे त्यांची भांडणे सोडविण्यासाठी शारदा गेल्या. विनायक याने त्यांना दगडाने मारहाण केली. पत्नीला मारत असल्याचे पाहून शारदा यांचे पती मध्ये आले. आरोपीने त्यांनाही मारहाण केली. शारदा आणि त्यांचे पती दोघेही जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.