Pimpri : प्रेयसीवर ब्लेडने वार करणाऱ्या प्रियकरावर गुन्हा

एमपीसी न्यूज – किरकोळ वादातून प्रेयसीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिच्यावर ब्लेडने वार केले. याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 13) दुपारी एकच्या सुमारास गांधीनगर पिंपरी येथे घडली.

आलम उर्फ सब्री आलम फरेदी (वय 28, रा. गांधी नगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षीय पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मागील दीड ते दोन वर्षांपासून त्यांच्यामध्ये प्रेम संबंध असल्याने ते एकत्र राहत होते. बुधवारी दुपारी त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला. या वादातून आरोपी याने फिर्यादी तरुणीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तरुणीच्या हातावर, छातीवर आणि गालावर ब्लेडने वार केले. यामध्ये तरुणी जखमी झाली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.