Pimpri : शालेय साहित्यासाठी दुकानांत गर्दी

एमपीसी न्यूज – शाळा सुरु होण्यासाठी अजून आठवडयाचा कालावधी आहे. शहरातील सर्व शाळा दि. 17 जूनला सुरु होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत.

पाठ्यपुस्तके, वह्या, स्कूलबॅग, छत्री, रेनकोट,कंपासपेटी, लंच बॉक्स, पाण्याची बॉटल, स्केच पेन, एक्झाम पॅड अशा शाळेची निगडीत वस्तूंच्या खरेदीसाठी पालक व विद्यार्थ्यांनी दुकानांमध्ये गर्दी केली होती.पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, स्केल असे एकत्रित साहित्याचे संच अनेक दुकान, मॉलमध्ये उपबल्ध आहेत. अर्धा डझनपासून हे संच सुरु होतात.

  • यातही वेगळेपण आणण्याचा प्रयत्न विक्रेत्यांनी केला आहे, अशी माहिती पिंपरीतील प्रिन्सेस दुकानाचे मालक दिनेश बिजवाणी यांनी सांगितली. काही कंपन्यानी असे संच बाजारात आणले आहेत. त्याची किंमत 60 रुपयांपासून साडेतीनशे रुपयांपर्यंत आहे.

वह्यांचा दर पुढीलप्रमाणे : –

दोनशे पानी – 380 ते 420, ए फोर आकारातील वह्या – 360 ते 660, शंभर पानी – 180 इतर साहित्यामध्ये छत्री – 200 ते 1500 रुपयांपर्यंत, पाण्याची बाटली – 50 ते 160, जेवणाचा डबा – 50 ते 250, रेनकोट 200 ते 1000 रुपयांपर्यंत बाजारात विक्रीसाठी आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.