Pimpri : दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; ‘गणपती बाप्पा मोरया…’ चा जयघोष

एमपीसी न्यूज – ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषासह शहरात ठिकठिकाणी दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. मोठ्या आनंदाने आणि उत्साहात गणरायाचे घरोघरी आगमन झाले होते. मात्र, काही भाविकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसातच बाप्पाचे विसर्जन करण्याची परंपरा पार पडत आज दुपारी दाेननंतर गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली.

श्री गणरायांची म्हणजे चतुर्थीच्या मुहूर्तावर स्थापना करण्यात आली होती. पिंपरी, चिंचवड, काळेवाडी येथील घाटावर लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांची गर्दी झाली होती. त्यानुसार मंगळवारी दुपारी दोननंतर अनेकांनी विसर्जनाची तयारी केली. त्यानंतर विधिवत पूजा, आरती करून नैवेद्य दाखवून विसर्जन करण्यात आले.

काहीच्या घरात परंपरेनुसार दीड दिवसांचा बाप्पा असतो. गणरायाला आवडणारे मोदक, हरब-याची मोकळी डाळ यांसह पेढ्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.