BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पिंपरी-चिंचवडकरांकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे विस्थापित झालेल्या अनेक पूरग्रस्तांसाठी पिंपरी-चिंचवड, प्राधिकरणातील शिवतेज प्रतिष्ठान, कृष्णा डायग्नोसिस सेंटर, पिंपरी-चिंचवड माऊंटेनरींग क्लब आणि एसीईएम शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मदतीचा हात दिला.

एकलिटर पाण्याचे १२५ बॉक्स ,पारले बिस्कीटचे ५० बॉक्स, २०० ब्लँकेट्स आणि मेणबत्तीचे २१० बॉक्स विभागीय आयुक्त कार्यालयात देण्यात आले.

आज राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन शिवतेज प्रतिष्ठानचे सुरेश वाडकर यांनी यावेळी केले.

HB_POST_END_FTR-A2

.