BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : कर्तव्यावरील पोलिसांना धक्काबुक्की करत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणा-या एकाला अटक

0
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार, मदतीसाठी गेलेल्या पोलिसांना तरुणाने धक्काबुक्की केली. तसेच संशयित आरोपीला पोलिसांनी पकडले असताना तरुणाने संशयित आरोपीला मारहाण करत पोलिसांसमोर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 12) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पिंपरीमधील अशोक टॉकीज जवळ घडली.

गणेश आलोक शिंदे (वय 28, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रावसाहेब जिजाबा खोडदे यांनी फिर्याद दिली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी अशोक टॉकीजजवळ राहणा-या सोनम चंदवानी यांच्या घरात काही तरुण मद्यधुंद अवस्थेत घुसले. ते तरुण घरात चोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे सोनम चंदवानी यांनी पिंपरी चिंचवड नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली.

पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षाकडून पिंपरी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलिसांचे एक पथक पिंपरीमधील अशोक टॉकीजजवळ घटनास्थळी गेले.

  • दरम्यान, सोनम यांनी त्यांच्या भावाचा मित्र गणेश शिंदे याला फोन केला. पोलीस आल्यानंतर गणेश घटनास्थळी आला. पोलीस आल्याचे समजताच घरात घुसलेले तरुण पळून गेले. त्यातील एक तरुण पोलिसांच्या हाती लागला. तो मद्यधुंद अवस्थेत होता. पोलीस त्याच्याकडे चौकशी करत होते. त्यावेळी गणेश याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाला मारहाण केली.

पोलिसांनी गणेशला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, गणेश याने पोलिसांचे ऐकून न घेता पोलिसांनाच धक्काबुक्की केली. पोलीस काम करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत पोलिसांनी गणेशला अटक करून त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.